मुंबई : जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे शेअर बाजार गेले काही दिवस कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. आज मात्र शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 800 अंकानी वधारत 30 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टीने 9000 अंकांचा टप्पा पार केला.
शेअर बाजार का वधारला?
जागतिक बाजारापेक्षा भारतीय बाजाराला आज चांगले संकेत मिळाले होते. तसेच अमेरिका आणि आशियाई बाजार वधारल्यामुळे भारतीय बाजारात त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात वाढ झालेली पाहायला मिळाली.
दिवसाच्या सुरुवातीला असा सुरु झाला कारभार
आज दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने 30 हजरांचा आकडा पार केला होता. तसेच 840.25 अंकांनी वधारत 30,734 अंकांनी शेअर बाजाराला सुरुवात झाली. तर एनएसईच्या निफ्टी 50 ची सुरुवात 246.35 अकांनी होत 8,995 वर गेला. आज निफ्टी 9032.55 अंकानी वधारला.
शेअर बाजार तेजीत; दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी 9000 तर सेन्सेक्स 30 हजार पार